
1 कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला आणि त्याने मृत्युपत्र केलेले नसेल तर मालमत्तेची विभागणी कशी करायची असा सवाल उपस्थित होतो. अनेकदा वाद उद्भवतो.
2 मृत व्यक्तीच्या निधनानंतर त्याची मालमत्ता वारस कायद्यानुसार ( हिंदू वारसा कायदा 1956) त्याच्या कायदेशीर वारसांमध्ये (आई, पत्नी, मुले) समान वाटली जाते.
3 वडिलोपार्जित मालमत्ता ः जर मालमत्ता वडिलोपार्जित असेल तर वारसांचा त्यावर जन्मतःच अधिकार असतो, त्यामुळे मृत्युपत्र नसेल तरीही वारसांना हक्क मिळतो.
4 भांडण टाळण्यासाठी ः मृत्युपत्र नसल्यास कुटुंबात मालमत्तेवरून वाद होऊ शकतात. अशा वेळी आपापसात समझोता करून किंवा कायदेशीर प्रक्रियेद्वारे वारस ठरवले जातात.
5 कायदेशीर वारसांची यादी तयार करा. मृत व्यक्तीच्या नावे असलेल्या मालमत्तेचे कागदपत्रे गोळा करा. संबंधित महापालिका किंवा न्यायालयात ‘वारस दाखल्या’साठी अर्ज करा.



























































