
आपल्या सोयीचे मतदारसंघ फेररचना करण्याचा मोदी सरकारचा घाट विधेयक फेटाळल्यानंतर उधळला गेला. यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, आम्ही राज्यघटनेवरील हा हल्ला यशस्वीपणे हाणून पाडला. हे केवळ महिला आरक्षणाचे विधेयक नव्हते, तर देशाची राजकीय रचना बदलण्याचा कट होता तो आम्ही रोखला.


























































