
अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे 66 हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यांना सरकारकडून 53 कोटी 73 लाख 7 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला.
अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे राज्याच्या विविध भागांतील 66 हजार 312 शेतकरी बाधित झाले. तसेच सुमारे 49 हजार 511.72 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी सरकारची आकडेवारी आहे.
बाधित शेतकरी आणि नुकसान
नागपूर विभाग – 1504 शेतकरी बाधित, 665.52 हेक्टर क्षेत्राचे नुकसान, 113.15 लाख मदत मंजूर. पुणे विभाग – 4,564 शेतकरी बाधित, 966.2 हेक्टर क्षेत्राचे नुकसान, 577.93 लाख रुपयांची मदत मंजूर. अमरावती विभाग – 51 हजार 729 शेतकरी बाधित, 42 हजार 388.97 हेक्टर क्षेत्राचे नुकसान, 4237.97 लाख रुपयांची मदत छत्रपती संभाजीनगर विभाग – 8,515 शेतकरी बाधित, 3,491.03 हेक्टर क्षेत्राचे नुकसान, 444.02 लाख रुपयांची मदत मंजूर.




























































