
हिंदुस्थानी क्रिकेटपटू विराट कोहलीने जर्मन इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल लिझलॅझचा एक ग्लॅमरस फोटो लाईक केला. हे लक्षात येताच, लोकांनी कमेंट्स सेक्शनमध्ये विराटला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विराटने लगेच पुन्हा एकदा तिच्या फोटोला अनलाईक केले. यावर आता लिझलॅझने प्रतिक्रिया दिली आहे. एचटी सिटीला दिलेल्या मुलाखतीत लिझलॅझ म्हणाली, “हे सगळं वेड लावणारं होतं. सकाळी उठल्याबरोबर मी पाहिलं की, सोशल मीडियावर फक्त माझीच चर्चा होती. मी सकाळपासून बातम्यांमध्ये होते. विराटने माझा फोटो कधी लाईक केला हे माझ्या लक्षातही आलं नाही. मला याबद्दल बातम्यांमधून कळलं. लोकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर माझ्याबद्दल जे काही लिहिलेले होते ते मला डीएम पाठवले. मला लोकांकडून खूप सारे मेसेज आले.”
विराट कोहलीच्या लाईकने पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कुणाच्या फोटोवर केले लाईक?
आज तकने दिलेल्या माहितीनुसार, लिझलॅझने एका जुन्या मुलाखतीत स्वतःला विराट कोहलीची फॅन असल्याचे सांगितले होते. क्रिकेटपटूसोबतच्या या संबंधाबद्दल ती म्हणाली, “मी गेल्या वर्षी पहिल्यांदा हिंदुस्थानला भेट दिली. मी बंगळूरहून एका मैत्रिणीला भेटायला आले होते. मी इथे फक्त दोन आठवडे होते, पण मला हा देश खूप आवडला. त्यानंतर मी अनेक महिने इथे राहिले आणि अनेक राज्यांना भेटी दिल्या. याच दौऱ्यात मला क्रिकेटबद्दल माहिती मिळाली. माझा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला पण मी जर्मनीमध्ये वाढले, तिथे फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ आहे. गेल्या वर्षी आयपीएलचा काळ होता. मी बंगळूरहून माझ्या मित्रांसोबत ते सामने पाहायला सुरुवात केली.” मला क्रिकेटचे व्यसन लागले. मी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरची फॅन झाले. विराट कोहली आरसीबीमधील सर्वोत्तम खेळाडू आहे. तो खूप चांगला आहे. म्हणूनच त्याने माझा फोटो लाईक केल्याने मला आनंद झाला.
विराटने तिचा फोटो डिसलाईक केल्यावर वाईट वाटले का, असे विचारल्यावर लिझलाझने उत्तर दिले, “नाही, मला त्याच्यासाठी वाईट वाटले. ही एवढी मोठी बातमी कशी झाली, हे मला माहीत नाही. लोकांच्या हे कसे लक्षात आले. कदाचित त्याचा तसा अर्थ नसेल. तरीही, मी त्याची आभारी आहे.”





























































