विराट कोहलीच्या लाईकने पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कुणाच्या फोटोवर केले लाईक?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू विराट कोहलीच्या प्रत्येक पोस्ट आणि लाईकची चर्चा होत असते. गेल्या वर्षी विराटने टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरचा एक फोटो लाईक केला होता. त्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. परंतु या फोटोच्या लाईकवर स्पष्टीकरण देताना, विराटने अल्गोरिदमचे कारण दिले होते. त्याने म्हटले होते की, अल्गोरिदमच्या समस्येमुळे तो लाईक गेला होता. परंतु आता मात्र विराट पुन्हा एकदा एका फोटोवर लाईक केल्याने, चर्चेत आलेला आहे.

आज तक ने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी विराटने एका परदेशी सौंदर्यवतीचा फोटो लाईक केला आहे. विराटने एका जर्मन इन्फ्लुएन्सर लिझलॅझचा (LizLaz) फोटो लाईक केला आहे. विराटने या परदेशी सौंदर्यवतीची ३० जानेवारीची पोस्ट लाईक केली आहे. त्यामध्ये ती पावडर ब्लू रंगाच्या हॉल्टर नेक ड्रेसमध्ये पोज देत आहे. लिझलॅझने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “गोल्डन शूट्स.” लिझलॅझची ही ३ महिने जुनी पोस्ट विराटच्या ‘लाईक’मुळे व्हायरल होत आहे. विराटचा लाईक पाहून युझर्सना आश्चर्य वाटत आहे.

लिझलॅझने मार्च महिन्यात फिल्मी मंत्रा मीडियाला एक मुलाखत दिली होती. त्यावेळी तिला तिचा आवडता क्रिकेटर कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने विराट कोहलीचे नाव घेतले होते. आता तिच्या पोस्टवर विराटचा लाईक बघून युझर्स पुन्हा एकदा विरालटला चिडवू लागले आहेत. सोशल मीडियावर आता विराटबाबत अनेक चर्चांना उधाण आलेले आहे. यामध्ये अनेकजण प्रश्न देखील विचारू लागले आहेत. एका युझरने विराटला विचारले, “विराट पुन्हा अल्गोरिदमचं निमित्त करणार का?” दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले, “आता विराट अडचणीत आला आहे. आपण अनुष्का वहिनीला काय म्हणणार?” आणखी एकाने म्हटले, “विराट पुन्हा एकदा लाईक्ससाठी अल्गोरिदमला दोष देईल.” सध्या  विराटकडून लिझलॅझच्या फोटोला लाईक केल्यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

लिझलॅझ एक लोकप्रिय जर्मन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर, गायिका आणि ट्रॅव्हल व्लॉगर आहे. ती भारतातील दैनंदिन जीवन, संस्कृती आणि प्रवासावर, तसेच शहरे आणि स्थानिक खाद्यपदार्थांवर व्हिडिओ बनवते. तिचे आकर्षक व्हिडिओ लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. लिझलॅझच्या कंटेंटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे व्हिडिओ स्क्रिप्टेड वाटत नाहीत. इंस्टाग्रामवर तिचे ४,२१,००० फॉलोअर्स आहेत.