दीपिका-रणवीर सिंग पुन्हा आई बाबा होणार, दुआसोबत फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रणवीर सिंग सध्या ‘धुरंधर’च्या यशाचा आनंद साजरा करत आहे. असे असताना रणवीरने आणि दीपिकाने पुन्हा एकदा एक आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आता दुसऱ्या बाळाच्या प्रतीक्षेत आहेत. या जोडप्याने इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची पहिली भेट २०१३ मध्ये ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि सहा वर्षांच्या डेटिंगनंतर, या जोडप्याने नोव्हेंबर २०१८ मध्ये इटलीतील लेक कोमो येथे लग्न केले. सप्टेंबर २०२४ मध्ये, त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला.

आता ते दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत. रणवीर आणि दीपिकाने ही आनंदाची बातमी जाहीर केल्यानंतर, त्यांच्यावर बाॅलिवुडमधून अभिनंदनाच्या मेसेजेसचा वर्षाव करण्यात येत आहे.

दीपिका पदुकोणचा ‘कोई नहीं’ हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित झाला नाही. ती शेवटची ‘कल्की २८९८ एडी’ मध्ये दिसली होती. तथापि, २०२५ मध्ये ती ८ तासांच्या शिफ्टच्या वादामुळे चर्चेत होती. याव्यतिरिक्त, तिचा अल्लू अर्जुनसोबतचा ‘राका’ हा चित्रपट येत आहे, ज्याचे दिग्दर्शन ॲटलीने केले आहे.