
जागतिक महिला औचित्य साधत शिवसेनेतर्फे गोरेगाव पूर्व येथील स्व. सौ. मीनाताई ठाकरे आधार केंद्र येथे सुरू असलेल्या योगासन प्रशिक्षण केंद्राला योगा मॅटचे वाटप करण्यात आले.
रोजच्या जीवनातील ताण-तणाव कमी करण्यासाठी योगा नेहमीच वरदान ठरले असून नियमित योगा केल्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. महिलांनी नियमित योगा करावा आणि आपले आरोग्य निरोगी ठेवावे यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना शाखा क्र. 54 चे नगरसेवक अंकित प्रभू यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पेंद्रातील सुमारे 40 महिलांना योगासनासाठी मॅट व प्रशिक्षणार्थींना खुर्च्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सायली प्रभू, गोरेगाव विधानसभा संघटक स्नेहा गोलतकर, शाखा संघटक शीला राठोड, शाखा समन्वयक सुचित्रा पालव आदी उपस्थित होते.






























































