
मध्य रेल्वेमार्गावर रविवारी माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. जलद मार्गावरील गाडय़ा धीम्या मार्गावर वळवण्यात आल्यामुळे दोन्ही मार्गांवरील लोकल सेवा विलंबाने धावली. ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी 10.40 ते दुपारी 3.10 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकावर डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे सर्व गाडय़ा गंतव्यस्थानी उशिराने पोहोचल्या. तसेच सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या गाडय़ांनाही विलंब झाला. सुट्टीच्या निमिताने कुटुंबीयासोबत घराबाहेर पडलेल्या प्रवाशांची या ब्लॉकमुळे तारांबळ उडाली.

























































