मालाडमध्ये लहान मुलांचे रुग्णालय सुरू करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाड पूर्व येथे पालिकेच्या भूखंडावर प्रसूतिगृहासह लहान मुलांचे रुग्णालय, चिकित्सा केंद्र, आयसीयूसह प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरीत सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधासभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. या भूखंडावर प्राथमिक आरोग्य केंद्र, दवाखाना, क्षयरोग ओपीडी सुरू करून 65 खाटांचे प्रसूतीगृह उभारण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुंबई उपनगर जिह्याच्या पालकमंत्र्यांना पत्र दिले, पण त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याकडे प्रभू यांनी लक्ष वेधले.