लंडनमध्ये ज्यू समुदायाच्या चार रुग्णवाहिकांची जाळपोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लंडनमध्ये ज्यू समुदायाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या चार रुणवाहिका अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याची संतापजनक घटना गोल्डर्स ग्रीन भागात घडली आहे. सोमवारी पहाटे 1 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही किंवा जीवितहानी झाली नाही. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. या हल्ल्याची नोंद ज्यूविरोधी द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून करण्यात आली आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्याच्या आधारे तपास सुरू केला आहे. ब्रिटनचे आरोग्य सचिव वेस स्ट्रीटिंग यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.