
घराचा ताबा घेण्यासाठी म्हाडा मुख्यालयात गर्दी होते. परंतु कार्यालयातील अपुऱया जागेत तासन् तास ताटकळत उभे रहावे लागत असल्यामुळे विजेत्यांचे खासकरून वृद्ध व महिलांचे हाल होतात. या त्रासापासून त्यांची सुटका करण्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने म्हाडा मुख्यालयातील मैदानात मंडप उभारला असून येथे लॉटरीमधील विजेते, बुक माय होम योजनेमधील अर्जदारांना घराचा ताबा, बॅंकेच्या लोनसाठी म्हाडाची एनओसी एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. त्यामुळे घराचा ताबा घेण्यासाठी आलेल्या विजेत्यांची धावपळ थांबणार आहे. तसेच विजेत्यांच्या सोयीसाठी या मंडपात खुर्च्या, पंखे, पिण्याचे पाणी अशा सुविधा देखील पुरविल्या आहेत. कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य अधिकारी (पणन) सारिका झनके यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.


























































