IPL 2026 – गुजरातविरुद्धच्या सामन्यात ‘हिटमॅन’ची एन्ट्री होणार? गोलंदाजी प्रशिक्षकाची महत्त्वाची अपडेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

IPL 2026 मध्ये आज (20 एप्रिल 2026) मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात रंगतदार चुरस पाहायला मिळणार आहे. एकीकडे गुजरातचा संघ विजयाचा चौकार मारण्यासाठी मैदानात उतरेल, तर दुसरीकडे मुंबईचा संघ पुन्हा विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी प्रयत्नशील असेल. मुंबईने आतापर्यंत पाच सामने खेळले असून त्यांना फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. अशातच मुंबईचा हुकूमी एक्का रोहित शर्मा दुखपतीमुळे मागच्या सामन्यात मैदानात न उतरल्याने संघाच्या अडचणींमध्ये अधिक भर पडली.

रोहित शर्माच्या फिटनेसबाबत मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी सामना सुरू होण्यापर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली आहे. म्हाम्ब्रे यांनी स्पष्ट केले की, रोहित शर्मा आणि मिचेल सँटनर हे दोन्ही खेळाडू आता पूर्णपणे फिट आहेत. रोहितने नेटमध्ये फलंदाजीचा सरावही सुरू केला आहे. जरी प्रशिक्षकांनी तो आजचा सामना खेळणारच याची अधिकृत पुष्टी केली नसली, तरी रोहित दुखापतीतून सावरल्यामुळे तो लवकरच मैदानात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संघ व्यवस्थापन त्याला अंतिम अकरामध्ये स्थान देते की ‘इम्पैक्ट प्लेयर’ म्हणून वापरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दुसऱ्या देशासाठी खेळण्यापेक्षा क्रिकेट सोडणे पसंत करेन; राशिद खानने नाकारली हिंदुस्थानच्या नागरिकत्वाची ऑफर

मुंबई इंडियन्ससाठी हा सामना अत्यंत निर्णायक आहे. पाच सामन्यांतून केवळ 2 गुण मिळाल्यामुळे मुंबईचे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचे गणित आता कठीण होत चालले आहे. इथून पुढे प्रत्येक पराभव मुंबईला स्पर्धेबाहेर नेण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या आणि संघ व्यवस्थापनाला गुजरातविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे. रोहित शर्माच्या संघात परतण्याने मुंबईची फलंदाजी अधिक मजबूत होईल आणि चाहत्यांना पुन्हा एकदा ‘हिटमॅन’चा जलवा पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.