
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आप अध्यक्ष प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान केजरीवाल यांनी शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील तामिळनाडू सरकारच्या कामाचे कौतुक केले.
केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटले की, “तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची भेट घेणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाबाबत आमची दृष्टी एक सारखीच आहे. आम्ही नेहमीच एकमेकांकडून शिकत आलो आहोत. त्यांच्या समर्पित शासनाने तामिळनाडूतील लोकांच्या जीवनात जो बदल घडवून आणला आहे, त्याचे मी मनापासून कौतुक करतो.”
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल २० आणि २१ एप्रिल रोजी एम.के. स्टॅलिन आणि डीएमकेच्या (DMK) समर्थनार्थ जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. आम आदमी पक्षाने या निवडणुकीत स्वतःचे उमेदवार उभे न करता सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्सला (SPA) पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Honoured to meet with the Chief Minister of Tamil Nadu, Thiru @mkstalin . We share a common vision for education, healthcare, and women’s empowerment.
We have always learnt from each other. I deeply appreciate the impact his dedicated governance has created in transforming the… pic.twitter.com/3hgnlpe6Pf
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 20, 2026

























































