
तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरात आज शनिवार रोजी शनी जयंती व शनी अमावस्या योग जुळून आला. राज्य परराज्यासह देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी शनि दर्शनासाठी गर्दी केली. उन्हाचा प्रचंड तापमानात सुद्धा भक्ती आणि शक्तीचा शनिशिंगणापुरात महापूर लोटला. लाखो भक्त शनी चरणी नसतं मस्तक झाले. “ओम नीलांजन समाभासंम रविपुत्रमं यमाग्रजम, छाया मार्तंड संभूतंम ओम नमामि शनैश्वराय नमः. शनि देवाच्या जयजय कराने संपूर्ण आसमंत उजळून निघाला. दर्शन रांग मंदिराच्या बाहेर लागल्याने भाविकांना दर्शनासाठी थांबवावे लागले. पहाटेचच्या आरतीपासून भाविकांच्या झुंडीच्या झुंडी शनी मंदिरात दाखल झाले . दुपारपर्यंत पाच लाखाहून अधिक भाविकांनी शनि दरबारी हजेरी लावली.
आज शनिवारी पहाटे शनि अमावस्यास प्रारंभ झाल्याने पहाटची आरती शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, पंकज पटेल गुजरात श्रीनाथ भीमले पुणे यांच्या हस्ते संपन्न झाले. दुपारी बारा वाजता शनि जन्म वेळी प्रवारा संगम येथून आणलेल्या पवित्र गंगाजलाने शनि महाराजांना जलअभिषेक घालण्यात आला. यावेळी पंचामृताने मूर्तीला स्नान घालण्यात आले नीलवस्त्र सुवर्णालंकार सोन्याचा मुकट परिधान करून साज चढवला. यावेळी दुपारची मध्यान मुख्य आरती सोहळा ऑस्ट्रेलिया येथील शनि भक्त राकेश कुमार व सौरभ बोरा आरती सोहळा संपन्न झाला. यावेळी आरती सोहळा पाहाण्यासाठी चौथरा जवळ हजारो भाविकांनी हजेरी लावली.
सकाळपासूनच भाविकांच्या ओघ शनी मंदिराकडे सुरू होता. मंदिराकडे येणाऱ्या चारही मार्गाने भाविक दाखल झाले. गर्दी प्रचंड झाल्याने शिडी मार्गे येणारे वाहने मुळा साखर कारखान्याचे वाहनं तळावर तसेच पुणे संभाजीनगर वरून येणाऱ्या वाहनांसाठी ग्रामीण रुग्णालय येथे सर्व वाहने थांबवण्यात आले. तेथून भाविकांना पायी चालत यावे लागले. मंदिरात अभिषेक भावनात पूजा पाठ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होत होते. शनि मूर्तीवर तेलाचा प्रचंड अभिषेक सुरू होता.
मुख्य महाद्वारमधून प्रवेश
शनि अमावस्या व शनी जयंती मुळे भाविकांची होणारे प्रचंड गर्दी लक्षात घेता देवस्थान प्रशासनाने केवळ मुख्य महाद्वाराधूनच प्रवेश दिल्याने भाविकांची प्रचंड दर्शन रांगेत गर्दी झाली. एकच गेट मधून भाविकांना प्रवेश दिल्याने गावकरी गेट व गेट क्रमांक २ बंद ठेवल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गैरसोय झाली. गावकरी गेट व गेट क्रमांक दोन येथे भाविक व सुरक्षा रक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अरेतुरे बचाबाची झाली . व्हीआयपी मार्गवर मोठा गोंधळ उडाला.
दोन किलोमीटरसाठी २० रुपये भाडे
वाहनतळ येथून भाविकांना मंदिरापर्यंत नेण्यासाठी मोठ्या प्रमाणातऑटो रिक्षाना पोलिसांनी परवानगी दिली. मुळा कारखाना साइटवर तळ क्र.१ येथे ऑटो रिक्षावाल्यांमुळे पायी चालणाऱ्या भाविकांना मोठा मनस्ताप करावा लागला. उन्हाचा मोठा पारा असताना सुद्धा भाविक दोन किलोमीटर पायी चालत शनी दर्शन घेतले. ऑटो रिक्षावाल्यांनी पण किलोमीटर अंतरासाठी भाविकांकडून वीस रुपये भाडे आकारले.






























































