मलबार हिलमधील गुजराती-जैन फलक हटवले, महापालिका मुंबईभर ही मोहीम राबवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेने मलबार हिल परिसरातील गुजराती, जैन बोर्ड हटवण्यास सुरुवात केली आहे.  गुजराती, जैन फलक हटवा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनसेकडून पालिका प्रशासनाला देण्यात आला होता. त्यामुळेच हे फलक काढण्यात आल्याची माहिती नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दिली.

मलबार हिलमधील एका चौकात गुजराती भाषेतील नामफलक लावण्यात आल्याबाबत मनसेने तीव्र आक्षेप नोंदवत आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसाही बजावल्या होत्या. मात्र मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर महापालिकेने संबंधित फलक हटवले आहेत. आगामी काळात संपूर्ण मुंबईत ही मोहीम राबवणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.