कुवेत विमानतळावर इराणचा हल्ला; एका हिंदुस्थानीचा मृत्यू, ६३ प्रवासी जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेने सुरू केलेल्या लष्करी कारवायांना प्रत्युत्तर म्हणून आज इराणने कुवेत आणि बहरीनमध्ये जोरदार हल्ले केले. कुवेतमधील विमानतळासह बहरीनमधील अमेरिकी हवाई तळावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात एका हिंदुस्थानी नागरिकाचा मृत्यू झाला, तर ६३ नागरिक जखमी झाले. दरम्यान, हिंदुस्थान सरकारने हल्ल्याचा निषेध केला असून दोन्ही बाजूंनी हल्ले थांबले पाहिजेत, असे म्हटले आहे.