
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. आता हिंदुस्थानकडून ते फक्त वन डे क्रिकेट खेळतात. पण तरीही 6 जूनपासून सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी या दोघांनाही संघाबरोबर राहावे लागणार आहे.
हिंदुस्थानची ही कसोटी संपल्यावर 13 जूनपासून तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.पहिला वन डे सामना हा धर्मशाळा येथे खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने कसोटी आणि वन डे मालिकेसाठी एका शिबिराचे आयोजन केले आहे आणि ते मुल्लानपूर येथे होणार आहे. त्यानंतर रोहित आणि विराट 9 ते 11 जूनपर्यंत मुल्लानपूर येथेच सराव करतील आणि त्यानंतर ते धर्मशाळा येथे पहिला वन डे सामना खेळण्यासाठी रवाना होतील.



























































