
आयपीएल फायनलनंतर वैभव आणि विराट कोहली यांच्यात काही वेळ चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. पण यावेळी नेमका काय संवाद झाला हे आता समोर येत आहे. यावेळी नेमकं काय बोलणं झालं हे त्यावेळी समजू शकलं नव्हतं. पण आता बंगळुरूच्या संघाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर विराट आणि वैभव यांच्यात झालेल्या संवादासह व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विराट वैभवला सांगताना दिसतोय की, ‘आता मागे वळून पाहायचं नाही, इथून आता फक्त वरच्या दिशेने जायचं आहे. जे काही आतापर्यंत घडलं आहे त्यामागे अथक मेहनत आणि विश्वास आहे. आता एवढय़ा घवघवीत यशानंतर कोण तुझ्याबद्दल काय बोलतंय, कसं बोलतंय, याकडे तू अजिबात लक्ष देऊ नको. एक बिहारी, सब पर भारी, फिर खतम गेम.’
























































