
एल.एल.एम. कॉमन एंट्रान्स टेस्ट (एल.एल.एम. सीईटी) परीक्षा 12 जून घेण्यात येणार असल्याचे मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे. दुपारी 2 ते 3 आणि संध्याकाळी 5 ते 6 या दोन सत्रात ऑनलाईन सेंटर बेस्ड परीक्षा होणार आहेत. परीक्षेच्या एक आठवड्याआधी हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. मुंबई विद्यापीठाकडून एल.एल.एम. प्रवेशासाठी सीईटीची परीक्षा 7 जून रोजी घेण्यात येणार होती. मात्र त्याच दिवशी ‘अखिल भारतीय बार परीक्षा 21’ ही बार कौन्सिल ऑफ इंडियामार्फत घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. एकाच दिवशी दोन्ही परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत विद्यापीठाने हे परीक्षा पुढे ढकलली आहे. मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर `Online LL.M. CET Exam – 2026-27′ येथे परीक्षेचा तपशील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

























































