
दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते विनय आपटे यांच्या 75 व्या जन्मदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारप्राप्त एकांकिकांचा महोत्सव आयोजित केला आहे. येत्या 17 जून रोजी रात्री 8 वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे हा महोत्सव होणार आहे.
यंदा सवाई एकांकिका स्पर्धा, मृणालताई करंडक, स्पंदन एकांकिका स्पर्धा आणि लोकांकिका अशा अनेक स्पर्धांमध्ये प्रथम पुरस्कार मिळालेल्या ‘जब वी मेटा’ या विलेपार्ले येथील म. ल. डहाणूकर महाविद्यालयाची एकांकिका सादर होणार आहे. सर्वेश देसाई यांनी या एकांकिकेचे लेखन केले असून दिग्दर्शन पराग ओझा यांनी केले आहे. तसेच ठाण्याच्या जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालयाची ‘मढं निघलय अनुदानाला’ या एकांकिकेने आयएनटी, अटल करंडक, रंगायतन करंडक, काsंकण चषक, अमर हिंद एकांकिका स्पर्धा अशा स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळवली आहेत. लेखक प्रतीक चौधरी आणि दिग्दर्शन महेश कपरेकर आणि सागर चव्हाण यांनी केले आहे. ही एकांकिकादेखील सादर केली जाणार आहे.



























































