युवासेना रत्नागिरीच्या वतीने वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन, गौरवी ओळकर प्रथम तर यश शेलार द्वितीय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने आयोजित ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा 2026’ स्पर्धेत गौरवी मंदार ओळकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय यश नितीन शेलार आणि तृतीय क्रमांक अथर्व विवेक पाध्ये यांनी पटकावला. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर, रत्नागिरी, चिपळूण आणि संगमेश्वर या विविध तालुक्यांमधून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

‘व्हिजन महाराष्ट्र 2050’ आणि ‘राजकारण आणि समाजकारण: युवकांची भूमिका’ या विषयांवर स्पर्धकांनी आपले परखड आणि अभ्यासपूर्ण विचार मांडून उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या गौरवी मंदार ओळकर हिला 10 हजार रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक विजेता यश नितीन शेलार याला 7 हजार रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांक विजेता अथर्व विवेक पाध्ये याला 5 हजार रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर सर्वच स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना सन्मानपूर्वक सहभाग प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

परीक्षक म्हणून गणपत शिर्के, रमाकांत सावंत आणि अमृत गोरे यांनी काम पाहिले. खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्याला युवती सेना जिल्हा विस्तारक श्रुतिका कदम, शिवसेना जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, रत्नागिरी तालुका प्रमुख मयुरेश्वर पाटील, रत्नागिरी जिल्हा युवा अधिकारी प्रसाद सावंत, उपजिल्हा अधिकारी संतोष हातनकर, युवती उपजिल्हा अधिकारी निशा भोबसकर, लांजा तालुका युवाधिकारी अभिजित राजेशिर्के, रत्नागिरी तालुका युवाधिकारी संदेश नारगुडे, चिपळूण तालुका युवाधिकारी प्रीतम वंजारे, रत्नागिरी शहर युवाधिकारी आशिष चव्हाण, शिवसेना महिला उपजिल्हा संघटक सायली पवार, रत्नागिरी विधानसभा क्षेत्र संघटक अनिशा नागवेकर, उपतालुका प्रमुख विजय देसाई, विभाग प्रमुख किरण तोडणकर, शिवसेना रत्नागिरी उपशहर प्रमुख सलील डाफळे, विभाग प्रमुख संदेश भिसे, निखिल बने, ओंकार कारेकर, नगरसेवक केतन शेट्ये, अमित विलणकर, अजिंक्य सुर्वे, तीर्था लाड, दिव्या सुर्वे, संतोष लिंगायत, आदित्य कामत उपस्थित होते.