दारू समजून प्यायला फिनाईल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दारू समजून फिनाईल प्यायल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विजय बागडे असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

विजय हा विलेपार्लेच्या शास्त्राrनगर येथे राहत होता. रविवारी सकाळी तो दारू पीत होता. काही वेळानंतर त्याने एका शीतपेयात दारू असल्याचे समजून फिनाईल प्यायला. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच विमानतळ पोलीस घटनास्थळी गेले. नशेत त्याने चुकून दारूऐवजी फिनाईल प्यायल्याचे तपासात समोर आले आहे. घडल्या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेतला. विमानतळ पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.