
तांब्या – पितळेची भांडी हवेतील ऑक्सिजन आणि ओलाव्यामुळे ऑक्सिडाईज होऊन काळी पडतात. ही भांडी घरगुती उपाय करून सहज स्वच्छ करता येतात. लिंबाच्या रसात मीठ आणि थोडी हळद मिसळून भांडी घासल्यास काळपटपणा निघून जातो.
कोमट पाण्यात चिंच भिजवून त्याचा कोळ तयार करा आणि त्याने भांडी घासा. तसेच एक चमचा बेकिंग सोडय़ात लिंबाचे काही थेंब किंवा व्हिनेगर मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट भांडय़ावर लावून काही काळ ठेवा.





























































