प्रणीत मोरे, सेजल पवारची सायबर सेलकडून 8 तास चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे याला ‘370 रुपयांच्या बिर्याणी’चा जोक चांगलाच महागात पडला आहे. तर मृतदेहावर आक्षेपार्ह टिप्पणी करणे सेजल पवारला चांगलेच भोवले आहे. या दोघांचीही महाराष्ट्र सायबर सेलने 8 तास कसून चौकशी केली आहे.

प्रणीत मोरे आणि सेजल पवार या दोघांचेही मोबाईल फोन पोलिसांनी फॉरेन्सिक तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा माझ्या एका स्टँड-अप कॉमेडी शोचा भाग असून तो साधारण तीन महिन्यांपूर्वी रेकॉर्ड करण्यात आला होता. या विधानामुळे लोकांच्या भावना इतक्या तीव्रतेने दुखावतील आणि या प्रकरणाला इतके गंभीर कायदेशीर वळण लागेल, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती, असे प्रणीत मोरेने यावेळी सांगितले.