महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा रद्द करा; काँग्रेस, सीपीआयची याचिका, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा हा संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. त्यामुळे हा कायदाच रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका काँग्रेस व कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व सीपीआयचे महाराष्ट्र मंडळ सचिव सदस्य प्रकाश रेड्डी यांच्या मार्फत ही याचिका दाखल झाली आहे. अर्बन नक्षलला प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा आणण्यात आला. कायदा व सुव्यवस्थेला बाधा असणाऱ्या संस्थांना वेसण घालण्यासाठी हा कायदा करण्यात आला होता. या अंतर्गत अशा संस्थांवर बंदी आणण्याचे, त्यांची  मालमत्ता जप्त करण्याचे व निधीवर टाच आणण्याचे अधिकार राज्य शासनाला देण्यात आले आहेत.