
बॉलीवूड अभिनेता आमीर खान तिसऱयांदा लग्नबंधनात अडकणार आहे. आमीर आपली मैत्रीण गौरी स्प्रॅटसोबत येत्या 5 जुलैला लग्न करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. गौरी हिच्यासोबत आमीर याचं लग्न थाटामाटात होणार नसून अत्यंत साधेपणाने दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. आमीरने पहिल्यांदाच या लग्नाबद्दल उघडपणे सांगितले आहे. आमीर म्हणाला, आम्ही साधेपणाने लग्न करणार आहोत. या लग्नात फक्त दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र असणार आहेत.
























































