‘हे टाइमपास सरकार, सभागृहात उत्तर द्यायलाही तयार नाही’; कर्जमाफीवरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार कर्जमाफीबाबत गंभीर नसून या विषयावर विधानसभेत चर्चा टाळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ANI सोबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, “सरकार खरोखर कर्जमाफी करणार आहे का? जर तशी घोषणा केली तर तीही खोटी ठरेल. हे टाइमपास सरकार आहे. आम्ही आज सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला, मात्र सरकारला त्यावर बोलायचेच नव्हते.”

यावेळी पटोले यांनी महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’चाही उल्लेख करत राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यात लोकशाहीची हत्या होत असताना मुख्यमंत्री त्यालाच पाठिंबा देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “राज्यात लोकशाहीची हत्या होत असताना त्याला पाठिंबा देणे हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर लोकशाहीची गळचेपी होत असेल आणि मुख्यमंत्री त्याचे समर्थन करत असतील, तर ते राज्याचे दुर्दैव आहे,” असे पटोले म्हणाले.