
रविवारी मध्यरात्री नांदेड ग्रामीण पोलिसांनी विष्णूपुरी शिवारातील गोदावरी नदीच्या किनार्यावर कारवाई करत अवैध रेती उपसा करणार्या चौघांवर कारवाई करत एक कोटी ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नांदेड ग्रामीण पोलिसांनी रविवारी मध्यरात्री विष्णूपुरी जवळील गोदावरी नदीच्या किनार्यावर धाड टाकली. त्याठिकाणी अवैध रेती उपसा करणार्या दोन क्रेन, एक जेसीबी, पाच इंजिन, ११ तराफे, २२ ब्रास रेती असा एक कोटी ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसुमे व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी आरोपी विश्वनाथ दुधमल (रा. ज्ञानेश्वर नगर), पांडूरंग मोरे (रा. छत्रपती चौक), अर्जुन बेटकर (रा. हिवरा, ता.पूर्णा), विजय देशमुख (रा. विष्णूपुरी) यांना अटक करुन त्यांच्याविरुध्द कारवाई केली आहे.

























































