
नवीन फ्रीज खरेदी करताना बहुतांश लोक फक्त किंमत, ब्रँड आणि आकर्षक डिझाईन पाहतात, परंतु 90 टक्के लोकांना फ्रीजमधील तांत्रिक गोष्टी आणि नवीन स्टार रेटिंगची माहिती नसते.
ग्रॉस विरुद्ध नेट कॅपॅसिटी, कन्व्हर्टिबल टेक्नॉलॉजी, स्मार्ट इन्व्हर्टर कॉम्प्रेसर, इन-बिल्ट स्टॅबिलायझर आणि टफंड ग्लास शेल्फ यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी तपासणे गरजेचे आहे.
या गोष्टींकडे दुर्लक्ष कराल तर नंतर अवाच्या सवा विजेचे बिल येऊ शकते आणि फ्रीजही लवकर खराब होण्याची शक्यता वाढते.

























































