
टोल नाक्यावर अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून टोल कर्मचाऱयांशी वाद होतात. यावेळी टोल नाक्यावरील कर्मचारी कार चालकाबरोबर गैरवर्तन करताना दिसतात.
अनेकदा टोल नाक्यावरील कर्मचारी गुंडगिरी करत लोकांशी गैरवर्तन करतात, पण टोल प्लाझावर तुम्ही कधी अशा गैरवर्तनाचा सामना करावा लागला तर घाबरू नका.
NHAI हेल्पलाइन क्रमांक 02672-252401,252402वर तक्रार करू शकता. काही समस्या किंवा फास्टॅगबाबत तक्रार असल्यास टोल फ्री क्र. 1033 वर कॉल करा.
अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी, NHAI ने काही महिन्यांपूर्वी सूचना जारी केल्या होत्या, ज्यानुसार टोल नाक्यावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱयांनी बॉडी कॅमेरे घालणे आवश्यक आहे.
कर्मचाऱयांनी जर शारीरिक हिंसा, दमदाटी किंवा वाहनाचे नुकसान केले तर तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घ्या आणि संबंधित कर्मचारी व व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करा.

























































