कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर दोन वृद्धांचा अत्याचार, पोक्सो अंतर्गत मुसक्या आवळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागात अल्पवयीन मुलीवर दोघा वृद्धांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सलीम शेख (६०) व अख्तर मणियार (६२) अशी त्यांची नावे असून पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा करा, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.

पीडित मुलगी गरीब कुटुंबातील असून अख्तर मणियार हा एपीएमसी मार्केटमध्ये चहा विक्रीचा धंदा करतो. तर सलीम शेख हा रिक्षाचालक आहे. आपल्या ओळखीचा फायदा घेत दोघांनी त्या अल्पवयीन मुलीला रात्री एका घरी नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. शेजाऱ्यांनी मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तातडीने पोलिसांना कळवण्यात आले.

कोळसेवाडी पोलिसांनी धाव घेऊन सलीम व मणियार यांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक व्हनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात असून दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी युवासेनेचे पदाधिकारी ॲड. नीरजकुमार यांनी केली आहे.