
अनेक जणांकडे दूध नेहमी खराब होण्याची तक्रार असते. चहा, कॉफी, दही, ताक, खीर इत्यादींसाठी दुधाचा वापर होतो. मात्र, दूध सतत खराब होत असल्यामुळे या पदार्थांच्या चवीवर परिणाम होतो.
दूध खराब होऊ नये यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. सतत दूध तापवणे टाळायला हवे. दूध खूप वेळ उकळत ठेवू नये. गरम दूध कधीही फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे.
दूध नेहमी स्वच्छ भांडय़ात ठेवावे तसेच भांडे नेहमी झाकून ठेवावे. फ्रिजमधून काढलेले दूध बराच वेळ बाहेर ठेवायला नको. आंबट पदार्थांपासून दूध लांब ठेवावे.





























































