
सलग आलेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक नालासोपाऱ्यातील समुद्रकिनारी दाखल झाले आहेत. मात्र शनिवारी सायंकाळी कळंब समुद्रकिनारी भरतीच्या लाटांच्या तडाख्यात एक मालवाहू टेम्पो अडकला. भरतीच्या वेळेचा अंदाज न आल्याने अचानक पाणी वाढले आणि टेम्पो समुद्रात अडकून पडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. भरतीचे पाणी ओसरल्यानंतर स्थानिकांनी दोरीच्या सहाय्याने टेम्पो बाहेर काढला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


























































