नौदलात ‘ब्रह्मोस’ सज्ज द्रोणागिरी! अँटी सबमरीन, आयएनएस अग्रय आणि संशोधक यांचाही समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वदेशी बनावटीच्या तीन युद्धनौका आज भारतीय नौदलात सामील झाल्या. कोलकाता येथील श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्टवर हा समांरभ  झाला. देशातच डिझाइन केलेल्या आणि बनवलेल्या जहाजांच्या समावेशामुळे नौदलाची ताकद वाढेल. युद्धनौकांची नावे एडवांस्ड स्टील्थ फ्रिगेट आयएनएस द्रोणागिरी, सर्वे वेसल आयएनएस संशोधक आणि अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट आयएनएस अग्रय अशी आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले,  ही नव्या भारताची सर्वात मोठी ताकद आहे. आज भारत संरक्षण क्षेत्रात केवळ खरेदीदार म्हणून राहू इच्छित नाही. आपली लष्करी शक्ती जगासाठी बाजारपेठ बनू शकत नाही.

आयएनएस संशोधक : आयएनएस संशोधक हे सर्वे वेसल मालिकेतील चौथे जहाज आहे. याचे काम युद्ध लढणे नाही, तर समुद्राचे सर्वेक्षण करणे आहे. हे किनारपट्टीवर आणि खोल समुद्रात हायड्रोग्राफिक सर्वेक्षण, समुद्री डेटा संकलन आणि संरक्षण-नागरी वापरासाठी तयार केले आहे. बंदरे आणि समुद्रातील मार्गांचे सर्वेक्षण करणे देखील यांच्या मुख्य कामात समाविष्ट आहे. हे समुद्राची खोली मोजू शकते.

आयएनएस द्रोणागिरी : आयएनएस द्रोणागिरी हे प्रोजेक्ट-17 एचे 5 वे स्टील्थ फ्रिगेट युद्धनौका आहे.  हे ब्रह्मोस पृष्ठ भागावरून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या सुपरसोनिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. याचे उत्पादन कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीयर्स लिमिटेडने  केले आहे. यात हेलिकॉप्टर चालवण्याची क्षमता आहे. याची स्टेल्थ (गुप्त) तंत्रज्ञान शत्रूच्या रडारपासून वाचण्यासही मदत करेल.

आयएनएस अग्रय : हे चौथे अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट म्हणजेच उथळ पाण्यातील युद्धनौका आहे. याला हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लाँचर आणि प्रगत सोनार प्रणालीने सुसज्ज करण्यात आले आहे. ज्यामुळे ते किनाऱ्यांवर तैनात असलेल्या शत्रूच्या पाणबुडय़ांचा शोध घेऊन त्यांना लक्ष्य करू शकते.