ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे सरकार धोक्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे सरकार अडचणीत आले आहे. ते सोमवारी राजीनामा देण्याची घोषणा करू शकतात. तसेच ते पद सोडण्याचा रोडमॅपदेखील जाहीर करू शकतात. स्टार्मर यांच्याविरोधात पक्षांतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे स्टार्मर यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

स्टार्मर यांच्या नेतृत्त्वाखाली लेबर पार्टीने 2024 मध्ये निवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र दिलेली आश्वासने त्यांना पूर्ण करता आलेली नाहीत. अनेक वाद, यू-टर्न आणि अपूर्ण आश्वासनांमुळे त्यांच्या प्रतिमेला तडा गेला. सातत्याने स्टार्मर यांची लोकप्रियता कमी झाली आहे. त्यानंतर आता त्यांना पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे. स्टार्मर यांच्या पक्षातील 100 पेक्षा जास्त खासदारांनी म्हटले आहे की, त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला हवा.