WTC 2027 – लॉर्ड्स स्टेडियमला धक्का! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याबाबत ICC मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसी World Test Championship 2027 च्या अंतिम सामन्याबात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा आतापर्यंतच्या इतिहासावर नजर टाकल्यास WTC चे सर्व अंतिम सामने इंग्लंडमध्ये खेळवण्यात आले आहेत. तसेच WTC 2027 चा अंतिम सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार होता. मात्र, आयसीसी लॉर्ड्सकडून या अंतिम सामन्याचे यजमानपद हिरावून घेण्याच्या तयारी असल्याची माहिती समोर आली आहे.

‘द टेलिग्राफ’च्या अहवालानुसार, आयसीसी आणि ईसीबी (ECB) या सामन्याचे आयोजन लॉर्ड्सऐवजी ‘द ओव्हल’ मैदानावर करण्याबाबत चर्चा करत असून ही चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या संभाव्य बदलाचे मुख्य कारण लॉर्ड्सची खेळपट्टी असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत संपल्याने लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर जोरदार टीका झाली होती. अगदी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनेही या खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली होती, ज्याची दखल घेत आयसीसीने या खेळपट्टीला एक ‘डिमेरिट पॉईंट’ दिला आहे. याच कारणामुळे आता लॉर्ड्सऐवजी केनिंग्टन ओव्हल मैदानाला फायनलचे नवे यजमान बनवले जाऊ शकते.

चौकार-षटकारांचा पाऊस! वैभवने श्रीलंकन गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली; मोडले एकाच वेळी 5 मोठे रेकॉर्ड्स!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा 2021 चा पहिला फायनल सामना साउदम्प्टन येथे झाला होता, जिथे न्यूझीलंडने हिंदुस्थानला 8 विकेट्सने हरवले होते. त्यानंतर 2023 चा फायनल सामना ओव्हल मैदानावर खेळवला गेला, ज्यात ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा पराभव करत जेतेपद पटकावले. तर नुकत्याच झालेल्या 2025 च्या फायनलमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला नमवून पहिल्यांदाच चॅम्पियन बनण्याचा बहुमान मिळवला होता.

FIH Hockey Women’s Nations Cup – हिंदुस्थानी महिलांचा ‘नेशन्स कप’वर पुन्हा एकदा कब्जा! यजमान न्यूझीलंडचा उडवला धुव्वा