
रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाट घाटात कोळशाने भरलेल्या एका १४ चाकी ट्रकच्या केबिनला भीषण आग लागल्याची घटना आज रविवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास घडली. देवरूख नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, शंभू चरण यादव (वय ४८, रा. हजारीबाग, झारखंड) हा चालक १४ चाकी टाटा ट्रक ३१ टन दगडी कोळसा घेऊन जात असताना आंबा घाटात पहाटेच्या सुमारास या ट्रकला अचानक आग लागली. अग्निशमन दलाचे कर्मचारी सचिन साळवी, राज कुंभार आणि आकाश करंडे यांनी तात्काळ आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर केले.


























































