
तमिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातील पेरियापालयमजवळील मंजांकरनाई येथील एका खाजगी सी-फूड आणि कोळंबी प्रक्रिया कारखान्यात रविवारी अमोनिया वायूची गळती झाली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, 40हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन सेवा आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, श्वासावाटे वायू शरीरात गेल्याने कारखान्यातील कामगार आणि तेथे उपस्थित असलेले अन्य लोक बेशुद्ध पडले. बाधित व्यक्तींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दोघांना मृत घोषित करण्यात आले, तर ४० हून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत. वायूगळती रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.




























































