
अफगाणिस्तानविरुद्ध नुकत्याच झालेल्या एक दिवसीय मालिकेत हिंदुस्थानने निर्भेळ यश मिळवले. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानने पाहुण्या अफगाणिस्तानला 3-0 अशी मात दिली. मायदेशात झालेल्या या मालिकानंतर आता हिंदुस्थानचा संघ अयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडविरुद्ध हिंदुस्थान तीन एक दिवसीय सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने हिंदुस्थानच्या संघाची घोषणा केली आहे.
जुलै महिन्यात खेळल्या जाणाऱ्या एक दिवसीय मालिकेसाठी हिंदुस्थानच्या संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि रनमशीन विराट कोहली यांचे पुनरागमन झाले आहे. पायाला झालेल्या दुखापतीमुळे विराट अफगाणिस्तानविरुद्धची मालिका खेळू शकला नव्हता, तर बुमराहला आयपीएलनंतर विश्रांती देण्यात आली होती. आता दोघेही संघात परतले असली तरी फिटनेस टेस्टनंतरच विराटच्या खेळण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
दुसरीकडे अफगाणिस्तानविरुद्ध पदार्पणाची संधी मिळालेला वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव आणि शेवटच्या एक दिवसीय लढतीत शतक ठोकणारा यशस्वी जैस्वालला इंग्लंडविरुद्धच्या संघातून डच्चू देण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्ध पहिला सामना 14 जुलैला एजबस्टन, दुसरा सामना 16 जुलैला सोफिया गार्डन्स आणि तिसरा सामना 19 जुलैला लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.
वरुण चक्रवर्ती बाहेर
दरम्यान, आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या 2 सामन्यांच्या टी-20 मालिकेतून फिरकीपटू वरुण चक्रवर्ती बाहेर झाला आहे. आयपीएल दरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली होती. वेदना होत असतानाही त्याने शेवटचे काही सामने खेळले होते. त्याच्या तब्येतीवर बीसीसीआय लक्ष ठेऊन आहे. अद्याप तो दुखापतीतून सावरला नसल्याने त्याचा आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली.
News
India’s ODI squad for the England tour announced.
: Varun Chakaravarthy has been ruled out of the Ireland T20I Series as he continues his rehab at the BCCI COE.
More Details ▶️ https://t.co/wOdXTQqJto #TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/t0GypgM4kp
— BCCI (@BCCI) June 21, 2026
इंग्लंडविरूद्ध मालिकेसाठी हिंदुस्थानचा संघ –
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उप-कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि गुरनूर ब्रार
आयर्लंडविरूद्ध टी-20 मालिकेसाठी सुधारित संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उप-कर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी, प्रसिध कृष्णा
























































