
भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या पिकअपच्या धडकेत पाच कामगारांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा-बैतूल राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले आहे.
टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, सर्व मयत आणि जखमी मछेरा गावातून कंहरगाव येथे शेतीच्या कामासाठी चालले होते. यादरम्यान छिंदवाडा-बैतूल महामार्गावर हा अपघात घडला. यात तीन महिला आणि दोन पुरुषांचा मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

























































