महाराष्ट्रात 77 महिला शेतमजुरांनी जीवन संपवलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नापिकी, लहरी हवामान, सावकारी पाश यामुळे राज्यातील 77 महिला शेतमजुरांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती विधानसभेतील उत्तरातून पुढे आली आहे. राज्यात या वर्षी पाच महिन्यांत 29 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. महिला शेतमजुरांच्या आत्महत्येची माहिती यानिमित्ताने प्रथमच पुढे आली आहे.

धर्मरावबाबा आत्राम, मनोज जामसुतकर, सुनील राऊत आदि सदस्यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती पुढे आली आहे.

प्रशासकीय चौकशीत अडकली आर्थिक मदत

राज्यात 2025मध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीची तीन प्रकरणे आणि या वर्षी जानेवारी ते मे या कालावधीत 29 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशा एकूण 32 प्रकरणांची चौकशी झाली. त्यातील 21 केसेसमध्ये आर्थिक मदत देण्यात आली, तर मदतीची 11 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.  तालुकास्तरीय समितीकडून संयुक्त चौकशी अहवाल प्राप्त करून घेऊन शेतकरी आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.