
गुगल पे, पेटीएमने पेमेंट करताना अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे खात्यातून पैसे कापले जातात, पण ते समोरील व्यक्तीला मिळत नाहीत. अशा वेळी नेमके काय करावे?
याची कारणे म्हणजे प्रामुख्याने मोबाईल नेटवर्कमधील अडथळे, बँकेचा सर्व्हर डाऊन असणे किंवा व्यवहार पूर्ण करणाऱ्या दोन बँकांमधील प्रक्रियेत होणारा विलंब.
जर खात्यातून पैसे कापले गेले असतील, तर लगेच दुसरा व्यवहार करू नका. बहुतांश वेळा २४ ते ४८ तासांत हे पैसे आपोआप परत येतात.
तक्रार करण्यापूर्वी ‘ट्रान्झॅक्शन हिस्ट्री’ किंवा बँक स्टेटमेंट तपासून व्यवहाराची स्थिती (Status) जाणून घ्या. ४८ तासांनंतरही पैसे न मिळाल्यास बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा.
बँकेकडून प्रतिसाद न मिळाल्यास तुम्ही थेट एनपीसीआयकडे (NPCI) जाऊ शकता. तक्रार करताना ‘ट्रान्झॅक्शन आयडी’ सोबत ठेवणे महत्त्वाचे आहे.





























































