अर्थवृत्त – फोक्सवॅगन 1 लाख कर्मचाऱ्यांना काढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑडी आणि पोर्शे अशा महागड्या कार बनवणाऱ्या कंपनी फॉक्सवॅगनने मोठी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे सीईओ ओलीवर ब्लूम यांनी फोक्सवॅगनच्या 89 वर्षांतील इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी खर्चात कपात करण्यासाठी जवळपास 1 लाख कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. तसेच कंपनी जर्मनीतील चार मोठे प्रोडक्शन प्लांट बंद करण्याची योजना बनवली आहे.

कंपनीकडे 2025मध्ये जगभरात 6 लाख 67 हजार 164 कर्मचारी होते. यात जवळपास 43 टक्के केवळ जर्मनीत काम करतात. याचाच अर्थ एकूण वर्कफोर्सपैकी 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाणार आहे. कंपनी हॅनोवर, ज्विकाऊ, एम्डेन प्लांट्ससोबत ऑडीचा नेकारसुलमची प्रमुख साइटवरील कामकाज बंद केले जाणार आहे. या प्लांटमध्ये ज्या मॉडल्सचे प्रोडक्शन सुरू आहे त्याचे पूर्णपणे फेज-आऊट झाल्यानंतर युनिट्सला पूर्णपणे बंद केले जाईल. कंपनीचा तोटा भरून काढण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी गुंतवणूक प्लानमध्ये जवळपास 15 टक्के मोठी कपात केली जाणार आहे. यानंतर कंपनीच्या ग्लोबल गुंतवणूक कमी होऊन जवळपास 130 बिलियन युरो म्हणजेच 148 बिलियन डॉलर होईल. दरम्यान, कंपनीच्या या निर्णयानंतर कामगार युनियनने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

‘हंगर नट्स’ आयपीओ

ड्रायफ्रूट्स क्षेत्रातील नामांकित ‘हंगर नट्स’ ब्रँडची मूळ कंपनी ‘ऍडॉन ऍग्रो कमोडिटीज लिमिटेड’ आपला आयपीओ घेऊन येत आहे. येत्या 29 जून 2026पासून हा आयपीओ सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.

फ्लिपकार्ट मिनिट्स

फ्लिपकार्टची क्विक कॉमर्स सेवा ‘फ्लिपकार्ट मिनिट्स’ सुरू झाल्यापासून दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत 130हून अधिक शहरे आणि 8,000हून अधिक पिनकोडमध्ये 1,000 मायक्रो फुलफिलमेंट सेंटर्सपर्यंत विस्तारली आहे.

अ‍ॅक्सिस बँकेचा विस्तार

अ‍ॅक्सिस बँकेच्या राज्यात 640 शाखा आणि 2,021 एटीएम व कॅश डिपॉझीट मशीनसह महाराष्ट्रात बँकेची दृढ उपस्थिती आहे. एकूण एमएसएमई बुक अंदाजे 2.93 लाख कोटी रुपयांवर असून बँकेच्या एकूण कर्ज पुस्तिकेत त्याचा वाटा 23.8 टक्के आहे.

हेन्केलचे नवे नेतृत्व

हेन्केलने प्रद्युम्न इंगळे यांची भारतातील कंट्री प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती केली आहे. प्रद्युम्न हे एस. सुनील कुमार यांची जागा घेतील, ज्यांनी गेल्या पाच वर्षांत हेन्केल इंडियाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. सुनील हे दुबईला स्थलांतरित होणार आहेत.

बिझनेस मजबूत होईल, यावर फोकस करा    

गुंतवणूकदार आणि उद्योगपतींनी शेअर्सच्या किमतीत दररोज होणाऱ्या चढ-उताराकडे ध्यान देण्याऐवजी लाभदायक आणि टिकाऊ व्यापार उभा करण्यावर फोकस करावा, असे आवाहन एनएसइचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार चौहान यांनी सांगितले. स्टार्टअप आणि छोटे उद्योगपती यांनी आपल्या व्यापाराचा विस्तार करण्यासाठी शेअर बाजारात सूचिबद्ध होणाऱ्या पब्लिक लिस्टिंगकडे एक रणनीती म्हणून पाहा, असेही ते म्हणाले. एनएसईमध्ये आयोजित जेआयआयएफच्या स्थापना दिवस कार्यक्रात ते बोलत होते.

स्टँडर्ड इंजिनीअरिंगची जिस्केलमध्ये हिस्सेदारी     

स्टँडर्ड इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी लिमिटेडने आज जिस्केल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडमधील 51 टक्क्यांची बहुसंख्य इक्विटी हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. जिस्केल एनर्जीचे नेतृत्व कासू ब्रह्म रेड्डी करत आहेत. गेहा एकूण गुंतवणूक कार्यक्रम टप्प्याटप्प्याने 500 कोटी रुपयांचा नियोजित केला असून तो पूर्णपणे ऑपेरेटिंग कॅश फ्लोमधून (कार्यरत रोख प्रवाह) स्व-निधीत असेल. पहिल्या टप्प्यात 190 कोटी रुपये गुंतवले जातील – ज्यामध्ये 125 कोटी रुपयांचा प्राथमिक भांडवल अंतर्भाव आणि 65 कोटी रुपयांचा समभाग अदलाबदल समाविष्ट आहे.

सहमतीला स्व-नियामक संस्था म्हणून मान्यता  

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सहमती या संस्थेला देशातील अकाउंट ऍग्रीगेटर परिसंस्थेसाठी स्व-नियामक संस्था म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. या परिसंस्थेमध्ये 1,120हून अधिक कार्यरत व नियमन-अंतर्गत असलेल्या आर्थिक संस्था, 176 आर्थिक माहिती पुरवठादार, 1,020 आर्थिक माहिती वापरकर्ते आणि 17 कार्यरत अकाउंट ऍग्रीगेटर्स यांचा समावेश आहे.

लेझर शस्त्रक्रिया संशोधन वर्ल्ड स्तरावर

एनआयओ सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल या प्रसिद्ध रुग्णालयाने नेत्रचिकित्सा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे महत्त्वपूर्ण संशोधन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. या संशोधनाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. डोळ्यांच्या आरोग्याबाबतीतील या महत्त्वपूर्ण संशोधनात डॉ. जाई केळकर  यांच्यासह परदेशातील 4 विविध देशांमधील नामांकित तज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेतला होता.

नॅशनल गारमेंट फेअरला खरेदीदारांची गर्दी   

क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीएमएआय) तर्फे आयोजित नॅशनल गारमेंट फेअरचे 83वे किड्सविअर एडिशन, 22 ते 24 जून 2026 दरम्यान मुंबईच्या गोरेगाव ईस्टमधील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित केले होते. हे प्रदर्शन यशस्वीपणे पार पडले. या प्रदर्शनात व्यावसायिक खरेदीदारांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.