
अहमदाबाद विमानतळावर सीमा शुल्क विभागाने बँकॉकमधून आलेल्या एका प्रवाशाकडून तब्बल 10 किलो हाड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. इब्राहिम सैफुल्ला (20) असे या प्रवाशाचे नाव असून त्याने त्याच्या चेक इन बॅगेत गांजा लपवला होता.


























































