असं झालं तर… बँकेचे पासबुक चोरीला गेले तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कधी कधी तुमचे पासबुक हरवते किंवा चोरीला जाते. अशा वेळी तुम्ही योग्य ती पावले उचलून सहज डुप्लिकेट पासबुक मिळवू शकता.

जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर (FIR) नोंदवा आणि त्याची एक प्रत (कॉपी) आपल्याकडे सुरक्षित ठेवा. बँकेत डुप्लिकेट पासबुकसाठी अर्ज करताना ही प्रत जोडावी लागते.

काही राज्यांमध्ये, जसे की महाराष्ट्रात, आता ऑनलाईन एफआयआर नोंदवण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे, ज्यामुळे ही प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे.
एफआयआर नोंदवल्यानंतर लगेचच तुमच्या बँकेला पासबुक हरवल्याची माहिती द्या. यामुळे तुमच्या खात्यातून होणाऱ्या संभाव्य अनधिकृत व्यवहारांना आळा बसेल.

तुमच्या बँक शाखेत जाऊन डुप्लिकेट पासबुकसाठी लेखी अर्ज करा. या अर्जासोबत एफआयआरची प्रत, [Aadhaar Redacted], पॅनकार्ड आणि तुमच्या बँक खात्याचा तपशील जोडा.