
राज्यातील बेरोजगार तरुणांना वाहतूक व पर्यटन क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ‘नमो सहकारी टॅक्सी’ योजना आणली जाणार असून ही योजना टॅक्सीचालकांच्या हितासाठी असल्याचा दावा करण्यात आला.
देवदत्त सहकारी संस्था पुनर्जिवीत करून या संस्थेच्या माध्यमातून टॅक्सी सेवा हा उपक्रम सुरू करण्याचा विचार आहे. पहिल्या टप्प्यात 3 हजार टॅक्सी रस्त्यावर आणल्या जातील. त्यात मराठी तरुण तसेच महिला चालकांनाही रोजगार मिळेल. ओला, उबर, रॅपिडो या खासगी कंपन्या चालकांची पिळवणूक करतात. ती थांबेल, असे विधान परिषदेतील भाजप गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी नमूद केले. ‘नमो सहकारी टॅक्सी’ योजनेबाबतचे आरोप त्यांनी फेटाळले.


























































