सीबीएसईची पोलखोल करणाऱ्या सिद्धांतचे पोर्टल, 1.66 कोटींच्या सरकारी खरेदीचा डेटा सार्वजनिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रांची येथील सीबीएसई १२ वीचा विद्यार्थी आणि टेक संशोधक सार्थक सिद्धांतने हिंदुस्थान सरकारच्या सेंट्रल पब्लिक प्रोक्युरमेंट (सीपीपी) पोर्टलवरील सुमारे १.६६ कोटींच्या सरकारी खरेदी नोंदी असलेले एक सार्वजनिक पोर्टल सुरू केले आहे.

सिद्धांतने यंदा १२ वीची परीक्षा दिली होती. कमी गुण मिळाल्याने त्याने पुनर्मूल्यांकनासाठी आपल्या स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका मागवल्या होत्या. १२ वीच्या वर्गासाठी ऑन स्क्रीन मार्किंग (ओएसएम) प्रणाली आणि ओएसएमचे काम करणाऱ्या COEMPT कंपनीशी संबंधित निविदा प्रक्रियेतील अनियमितता त्याने उघड केली होती. यानंतर आता सार्थकने सार्वजनिक पोर्टल सुरू केले आहे. त्या माध्यमातून त्याने गेल्या दोन आठवड्यांत गोळा केलेले रेकॉर्ड्स सामान्य लोक, पत्रकार आणि संशोधकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत, जेणेकरून कोणीही हे रेकॉर्ड्स सहजपणे पाहू शकेल आणि त्यांचे विश्लेषण करू शकेल.

सोशल मीडियावर सिद्धांतने लिहिले आहे की, पारदर्शकता प्रत्येकाच्या आवाक्यात असावी आणि आजपासून हे शक्य आहे. सिद्धांतने नागरिक, पत्रकार आणि संशोधकांना आवाहन केले आहे की, त्यांनी हा डेटा डाऊनलोड करून त्याची तपासणी करावी.