वर्ल्ड कप राऊंड अप – उरुग्वेचे चार्टर रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन वेळचा विश्वविजेता उरुग्वेचे स्पेनकडून ०-१ अमगा पराभवानंतर आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. मात्र पराभवापेक्षा मोठा धरका त्यांना त्यांच्याच फुटबॉल महासंघाकडून बसला. संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीवर संतापलेल्या महासंघाने खेळाडूंसाठी आधीच बुक केलेले चार्टर विमान रद्द केले. त्यामुळे आता सर्व खेळाहूंना वेगवेगळ्या कमर्शियल विमानांनी मायदेशी परतावे लागणार आहे गटात एकही विजय न मिळवणाऱ्या उरुग्वेने केग वर्दे आणि सौदी अरेबियाविरुद्ध बरोबरी केली, तर स्पेनकडून पराभव स्वीकारला.

मोद्रिचचा विश्वविक्रम
वय फक्त आकडा असतो, हे पुन्हा एकदा कोएशियाच महान मिडफिल्डर लुका मोद्रिचने सिद्ध केले घानाविरुद्धच्या निर्णायक सामन्यात ८३ व्या मिनिटाला त्याने घेतलेल्या अचूक कॉर्नरवर निकोला व्लासिचने हेडरद्वारे गोल झळकावला या असिस्टसह मोद्विच फिया विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक वयात असिस्ट करणारा खेळाडू ठरला. हा त्याचा पाचवा विश्वचषक असूनही त्याचा फिटनेस, पासिंग, खेळ वाचण्याची क्षमता आणि नेतृत्व आजही तस्गण बेळाडूंना लाजवेल असे आहे.


मेस्सीचा सातवा चमत्कार
अर्जेटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सीने अणखी एक अशक्यप्राय विक्रम आपल्या नावावर केला आहे. जॉर्डनविरुद्धच्या सामन्यात व्या मिनिटाला अप्रतिम प्रत्र-किकवर गोल करत तो वर्ल्ड कपच्या इतिहासात सलग सात सामन्यांत गोल करणारा पहिलाच फुटबॉलपटू ठरला. पापूर्वी सहा सलग सामन्यांत गोल करण्याचा विक्रम फ्रान्सच्या जस्ट फॉन्टेन आणि ब्राझीलच्या जैरझिन्छो यांच्या नावावर होता. जॉर्डनविरुद्धचा हा मेसीगा वर्ल्ड कपचा १९ वा गोल ठरला.

मेस्सी-रोनाल्डो महामुकाबला अशक्य
कोट्यवधी फुटबॉलप्रेमी ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते त्या लिओनेल मेसी आणि खिस्तियानो रोनाल्डो पंच्या संभाव्य लढतीची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे. कोलंबियाविरुद्ध पोर्तुगालचा गोलशून्य बरोबरीत सुटलेला समना निर्णायक ठरला. पा निकालामुळे पोर्तुगालला गटात दुसऱ्या स्थानावर समाचान मानावे लागले आणि अजेंटिना व पोर्तुगाल केावेगळ्या नॉकआऊट ब्रेक्टिमध्ये गेले त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीतील संभाव्य महामुकाबला हुकला.