स्काय व्हिलाच्या रहिवाशांना पाच वर्षांनंतर दिलासा; शिवसेनेने मिळवून दिले शेअर सर्टिफिकेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
goregaon-dindoshi-sky-villa-society-members-get-share-certificates-after-5-years-shivsena-mla-sunil-prabhu

गोरेगाव दिंडोशी येथील स्काय व्हिला गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांना शिवसेनेच्या प्रयत्नांतून तब्बल पाच वर्षांनंतर शेअर सर्टिफिकेट मिळाले आहे. शिवसेनेने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असून त्यांना हा न्याय मिळाला आहे. आज संस्थेतील 50 सदस्यांना शेअर सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले.

गेली पाच वर्षे गोरेगाव दिंडोशी येथील स्काय व्हिला गृहनिर्माण संस्थेतील सदस्यांची विकासकाने फसवणूक करत त्यांना अक्षरशः वाऱयावर सोडले होते. त्यांना पाणी व वीज यांसारख्या प्राथमिक गरजेसह अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात येताच शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेशी संवाद साधत हा प्रश्न निकाली लावला. आज संस्थेतील 50 नागरिकांना सुनील प्रभू यांच्या हस्ते शेअर सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक तुळशीराम शिंदे, सुहास वाडकर, शाखाप्रमुख संपत मोरे व संदीप जाधव यांच्यासह संस्थेचे चेअरमन सुधाकर विंदे, सचिव स्मिता कनगुटकर, कार्यकारी सदस्य कमलेश देवणीका, लोकनाथ पांडे, सुधांशू खांडेकर, विना केलानी व संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

अजून लढाई बाकी

संस्थेतील नागरिकांना शेअर सर्टिफिकेट मिळाले असून हा पहिला टप्पा आहे. अजून इमारतीची ओसी मिळणे बाकी आहे. त्यामुळे अजून लढाई बाकी असल्याने संस्थेच्या सर्व सदस्यांनी एकजुटीने राहण्याचे आवाहन सुनील प्रभू यांनी केले आहे. या लढाईसाठी मी आणि शिवसेना तुमच्यासोबत राहणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.