
प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरील अभ्यासासाठी जगभर प्रसिद्ध असणाऱ्या प्रख्यात भारतीय इतिहासकार रोमिला थापर यांचे अतिशय समृद्ध आणि विस्तृत आत्मचरित्र “Just Being: A Memoir” या नावाने प्रकाशित झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या या विदुषीच्या जीवनप्रवासाचा हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. ‘सी गल’ या इंग्रजी प्रकाशनगृहाद्वारे हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संस्मरणात इतिहासकार म्हणून एका स्वतंत्र, राजकीयदृष्टय़ा जागरूक आणि भारतीय स्त्राr इतिहासकाराचा प्रवास यात अगदी बारकाईने उलगडण्यात आला आहे. एका स्वतंत्र बाण्याच्या स्त्राrचा निर्भय प्रवास असेच या आत्मचरित्राचे वर्णन करायला हवे. त्यांनी केवळ स्वतच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच नव्हे, तर गेल्या 100 वर्षांतील भारताच्या सामाजिक आणि राजकीय बदलांचा सखोल वेध घेतला आहे. वसाहतकालीन भारतातील बालपण, लंडनमधील शैक्षणिक दिवस, भारतात परतल्यानंतर दिल्लीमधील अध्यापन कारकीर्द असा सारा प्रवास यात मांडला आहे. एका विदुषी स्त्री इतिहासकाराचे हे चरित्र भारताच्या इतिहासासोबत या लेखिकेच्या आयुष्याचा पटही मांडते.





























































